
धक्कादायक! पंढरपुरात युवती भेळ खाऊन निघाली अन् झाला ॲसिड हल्ला…
सोलापूर : पंढरपूर शहरांमध्ये एका युवतीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत (वय २१) असे या पीडित युवतीचे नाव असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकारात अज्ञात युवकाचा शोध सुरू केला असून, या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
पंढरपुरात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असताना दुसरीकडे शहरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. युवती रविवारी सायंकाळी भेळ खाण्यासाठी गेली होती. भेळ खाऊन परत येत असताना दोन अज्ञातांनी दुचाकीवर येऊन अचानक तिच्यावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यासह विविध ठिकाणी अंग भाजले आहे. ही घटना घडताच कुटुंबीयांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे पीडितेचे डोळे वाचवण्यात यश आले आहे.
रविवारी सायंकाळी उशिरा ही धक्कादायक घटना घडली. मात्र, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तिथे रात्रीच्या वेळी दुकाने बंद होती आणि परिसरात काही प्रमाणात अंधार होता. यामुळे आरोपींची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याद्वारे आरोपींचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांची विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पंढरपूर हादरलं! नगरसेवकाकडून 3 जणांवर कोयत्याने सपासप वार, कारण समोर…
पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…
पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….
पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

