
हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…
मुंबई : एका व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून वरळी सी-लिंकवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती. भावेश सेठ असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी-लिंकवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या व्यावसायिकाने आत्महत्येपुर्वी मुलाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितले आणि थेट सिलिंकवरुन उडी मारली. भावेश सेठ असे या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता. व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेश यांनी नैराक्षतून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
भावेश सेठ यांनी बुधवारी (ता. १७) दुपारी एका अज्ञात व्यक्तीकडे सि-लिंकपर्यंत लिफ्ट मागितली. सिलिंकवर उतरल्यानंतर आत्महत्येपूर्वी भावेशने मुलगा स्मिथ सेठ (वय 28) याला फोन करून त्याची माफी मागत आपण आतमहत्या करत असल्याची कल्पना दिली. सी-लिंकवरील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जवळ असलेले मच्छिमार पोलिसांची वाट न पाहता सेठ याच्या मदतीला धावले. सेठ यांना उपचरासाठी भाभा रुग्णालयात नेले असता. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना आत्महत्या केलेल्या जागेवर एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात ‘सॉरी बेटा सर्व काही गोष्टींसाठी, कुटुंबाची काळजी घे’ असे म्हटले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मुंबईत काही दिवसांपूर्वीच बाप-लेकाने हातात हात धरुन ट्रेनखाली आत्महत्या केली होती.
हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…
मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू…
मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

