युवतीला बाप-चुलत्याने हालहाल करून मारलं; पुण्यात संपवलं अन् सातारा…

सातारा: खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी 14 सप्टेंबर रोजी युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. मुलगी रात्री अपरात्री मुलांसोबत बाहेर फिरते, उलटे बोलते म्हणून वडिलांनीच चुलत चुलत्याला सोबत घेत मुलीला संपवलं. यानंतर पोलिसांनी वडील आणि चुलत्याला अटक केली.

हर्षदा हणुमंत जाधव (वय 19, रा. आंबेगाव खुर्द जि. पुणे) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील हणुमंत दामोदर जाधव आणि चुलत चुलते बाळू अंकुश जाधव अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शिरवळ ते राजेवाडी मार्गालगत 14 सप्टेंबर रोजी एका युवतीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांना हा प्रकार संशयास्पद आणि खुनाचा असल्याचे लक्षात आले. त्या दिशेने तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. हर्षदा ही घरातील लोकांना शिवीगाळ करायची. मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरणे, व्यसन करणे, घरातील लोकांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देणे अशा प्रकारे ती सगळ्यांना त्रास देत होती. त्यामुळे कुटुंबीय तणावात होते.

एक दिवशी वडील व चुलते यांनी हर्षदाला, ‘बाहेर हॉटेलला जेवण करण्यास जायचं आहे’, असे सांगून गाडीतून बाहेर आणले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत व तोंडात चटणी घालून हाताने तोंड व नाक दाबून तिचा खून केला, अशी कबुली त्यांनी दिली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिचा मृतदेह निर्जन स्थळी रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि तेथून पळ काढला. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग १६ दिवस तपास चक्र फिरवून या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी वडील हणुमंत दामोदर जाधव आणि चुलते बाळू अंकुश जाधव यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत सातारा स्थानिक गुन्हे शाखेने आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले आणि संशयास्पद वाहनांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. सलग १६ दिवस कसून तपास केल्यानंतर पोलिसांनी अखेर या हत्येचं गूढ उकलले आहे.

पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला; गोळीबारानंतर रुग्णालयात नेले; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा नवा कोन…

केतन हत्या प्रकरण; ‘चेतनने माझ्यासमोर त्याला किल्ल्यावरून खाली ढकलले, मलाही धमकी दिली’, साक्षीदाराचा खुलासा…

राजधानी पुन्हा हादरली! मित्रानेच तिला दगा; सामूहिक अत्याचार अन् निर्घुण हत्या…

पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…

ब्रिटनमधून एमटेक पदवीप्राप्त तरुणाने शेजाऱ्याच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून केली निर्घृण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!