नाशिकमध्ये खळबळ! निर्जन रानात युवतीची हत्या; काळे कपडे अन् शेजारी पिझ्झा…

नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत युवतीची (वय २५) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारूळ परिसरातील निर्जन रानात तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी स्थानिक नागरिकांना एका युवतीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुमारे 25 वर्ष वयोगटातील तरुणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. प्राथमिक पाहणीत तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना मृतदेहाजवळ पिझ्झाचा बॉक्स तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आले. त्यामुळे ही तरुणी कोणासोबत येथे आली होती का, किंवा तिने येथे अन्न मागवले होते का, या शक्यतांवरून तपास सुरू आहे. युवतीच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. ही हत्या घटनास्थळीच झाली की अन्यत्र हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकण्यात आला, याचाही शोध पोलिस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

नाशिक! 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

नाशिक! रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू अन् तिथेच आठवडापूर्वी…

नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!