श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचाही श्वास थांबला; अखेरची इच्छा राहिली अधुरी…

मुंबई: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात तिला न्याय मिळावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे तिचे वडील विकास वालकर यांचे आज (रविवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विकास वालकर यांची आज सकाळी 8 वाजता अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी विकास वालकर यांना मृत घोषित केले.

मुलगी श्रद्धाच्या हत्येनंतर विकास वालकर हे निराश होते आणि मुलीवर अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेहाचे उर्वरित तुकडे मिळण्याची वाट पाहत होते, असे जवळच्या नातेवाईकांना सांगितले. श्रद्धा वालकर हिची हत्या तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने केली होती. त्यानंतर तिच्या त्याच्या शरीराचे तुकडे करून अनेक दिवस फ्रिज ठेवले होते. नंतर त्याने मेहरौलीमध्ये त्या तुकड्यांची टप्प्या टप्प्याने विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

आफताब पूनावाला याने 18 मे २०२२ रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते फ्रीज मध्ये ठेवले होते. सहा महिन्यांनंतर जेव्हा तिचे वडील विकास वालकर यांनी त्यांच्या मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रात दाखल केली होती तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. वडील विकास हे अडीच महिन्यांपासून श्रद्धाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा मुलीशी संपर्क झाला नव्हता.

आफताबने श्रद्धाची केवळ हत्याच केली नाही तर तिची ओळख लपवण्यासाठी तिचा चेहराही जाळला होता. तो रात्री घराबाहेर पडायचा आणि मृतदेहाचे अवयव फेकून देऊन परत यायचा. दिल्ली पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आफताब याला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. आफताबसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी ती तिच्या आई आणि भावासोबत वसईमध्ये राहत होती.

आफताबला फाशीची शिक्षा मिळाली असती, तर कदाचित विकास वालकर यांना एक समाधान मिळाले असते. पण आता त्यांचा आवाज कायमचा शांत झाला. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहणाऱ्या या पित्याचा अखेरचा श्वास आज थांबला.

श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती; युवतीच्या मृतदेहाचे ३० तुकडे अन्…

महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची आत्महत्या अन्…

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…

नार्को टेस्ट म्हणजे काय असते? कशी केली जाते? घ्या सविस्तर जाणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!