
नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन…
नाशिक : एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सौंदाणे (मालेगाव) गावात घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
हर्षाली राहुल अहिरे (वय 28), संकेत अहिरे (वय 5) व आरोही अहिरे (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. सासरच्या छळाला कंटाळूनच हर्षाली राहुल अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू, सासरा, नणंद या चौघांविरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत विवाहितेचा पती, सासरा पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…
नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…
नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…

