पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला…

पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित ठेकेदार जखमी झाला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रितेश परदेशी असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ठेकेदारीचं काम करतात. उमेश वाघमारे असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता परदेशी आपल्या दुचाकीने येरवड्यातील जयजवान नगर परिसरातून जात होते. यावेळी तिथे उमेश वाघमारे तिथे आला. त्याने कपड्यांमध्ये कुऱ्हाड लपवली होती. हल्ला करण्यापूर्वी त्याने परदेशी यांना थांबवले आणि अचानक कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली.

परदेशी यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीचा वार आपल्या हातावर झेलला. हल्ला झाल्यानंतर ते दुचाकीसह खाली पडले. यानंतर आरोपी वाघमारे याने परदेशी यांच्यावर एकपाठोपाठ एक वार केले. भररस्त्यात हा हल्ला झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना पाहून आरोपी वाघमारे घटनास्थळावरून फरार झाला. जखमी झालेल्या परदेशी यांना नागिरकांनी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जखमी रितेश परदेशी आणि हल्लेखोर उमेश वाघमारे एकमेकांना ओळखतात. पण परदेशी यांचे उमेश वाघमारे यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय उमेशला होता. यातूनच त्याने परदेशी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परदेशी यांच्यावर उपचार सुरू आहेत.’ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी घटनास्थळी भेट घेतली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

satish-wagh-pune

सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!