
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणी राजकीय नेत्याला अटक…
नाशिक : कुंटणखाना प्रकरणी एका राजकीय नेत्याला नाशिक क्राइम ब्रँचने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील तपोवन येथील एका हायप्रोफाइल सोसायटीत हा कुंटणखाना सुरू होता. नाशिक पोलिसांनी धाड टाकून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे.
तपोवन येथील हायप्रोफाइल सोसायटीत कुंटणखाना सुरू होता. राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती समजली होती. कविता साळवे पाटील नावाची महिला हा कुंटणखाना चालवत होती. तिला पवन क्षीरसागरचा सपोर्ट होता, असा आरोप होत होता. या प्रकरणी पोलिसांनी पवन क्षीरसागरला अटक केली आहे. पवन क्षीरसागर हा आरपीआय आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्र संघटक आहे.
कुंटणखाना जिथे चालू होता, त्या परिसरातील नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. फेब्रुवारी महिन्यात नागरिकांनी ठिय्या आंदोलनही केले होते. कुंटणखान्याकडे जाणारे युवक आणि ग्राहक हे परिसरात राहणाऱ्यांना पत्ता विचारतात, काही दारू पिऊन आलेले असतात, गुंड असतात. याचा त्रास नागरिकांना व्हायचा, याशिवाय महिलांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, पवन क्षीरसागर यांच्यावर यापूर्वीही अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत. जुन्या वादातून एकाला मारहाण केली होती. क्षीरसागर यांच्यासह साथीदारांनी अडवून धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात काही वर्षांपूर्वी गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…
Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…
नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…

