पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

पुणे : एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. मुलीच्या घरात शिरून त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षीय मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (२२, रा. रा. मोझे आळी, लोहगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ व पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहण्यास होते. गेल्या ८ दिवसांपासून सोमनाथ याने पीडित मुलीला क्लासला जात असताना, तिच्याजवळ येत रिक्षा थांबवली. त्यानंतर तिला रिक्षात बस मी सोडतो असे म्हणत जबरदस्ती केली. यानंतर ११ सप्टेंबर रोजी सोमनाथने मुलीच्या घरात शिरून हॉलमधील सोफ्यावर बसत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेची आई घरात आल्याने सोमनाथ त्यांना धक्का देऊन पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पीडीतेची आई मागे धावली असता, मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. संबंधित प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व आत्महत्येस जबाबदार धरुन सोमनाथवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लहाने पुढील तपास करीत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहाने करत आहेत.

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पतीच्या बॉसने केला महिलेचा विनयभंग अन्…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!