
पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे: बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाने रेकॉर्ड वरील सराईत आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या अनुशंगाने श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ निरीक्षक यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्याचे सक्त आदेश दिले. आदेशाचे अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार असे पो.स्टे हद्दीत गस्त घालीत असताना मालधक्का रोड वर रेल्वे कॉर्टसचे सीमाभिंतीजवळ एक संशयीत व्यक्ती थांबलेला असुन त्याचे कमरेला पिस्टल सारखे हत्यार आहे, अशी खात्रीशिर बातमी पो.अं. ९८६७ ज्ञानेश्वर बडे, पो.अं.१२००३ मनोज भोकरे, पो. अं. १०२५३ मनिष संकपाळ यांना प्राप्त झाली होती. पोलिस उप-निरीक्षक धिरज गुप्ता व स्टाफने सदर इसमास सापळा लावुन ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक देशी बनावटीचे मॅक्झीनसह पिस्टल मिळुन आले. पो.अं. ज्ञानेश्वर बडे यांनी देव दिनेश परमार (वय २३ वर्षे, रा. स्विपर चाळ वीर भारत तरुण मंडळ दुर्गामाता जवळ, भाजी मार्केट, १३ ताडीवाला रोड, पुणे) याचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २८०/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३(५) व महाराष्ट्र पोलिस का. कलम महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम ३७ (१) (२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नमुद गुन्हयात त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द बंडगार्डन पोलिस ठाणे येथे एकुण ०५ गुन्हे दाखल असुंन त्याचेवर यापुर्वी एमपीडीए अंतर्गत स्थानबंधतेची कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह.आयुक्त, राजेंद्र बनसोडे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मिलिंद मोहिते, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, संगिता आल्फान्सो शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, श्रेणी पो.उप-निरीक्षक मोहन काळे, सहा. पोलिस उप-निरीक्षक प्रदिप शितोळे, पो.हवा. सारस साळवी, प्रकाश आव्हाड, पो.अं. ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, राजु धुलगुडे यांच्या पथकाने केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…
पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

