
पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न अन्…
पुणे: पुणे शहरातील औंध येथील परिहार चौकात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहापैकी एका आरोपीला न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तीन अल्पवयीन मुलांना १४ दिवस बालनिरीक्षणगृहात ठेवले आहे, आणखी दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी शुक्रवारी तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
दारू प्यायल्यावर आरोपींनी हा गुन्हा केला आहे, त्यांच्या हल्ल्यांत गंभीर जखमी झालेले ज्येष्ठ नागरिक समीर रॉय चौधरी ब्रेनडेड (मेंदू मृत) अवस्थेत होते. त्यांच्या अवयवदानाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे ज्युपिटर रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. जय सुनिल घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) असे पोलिस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार असलेल्या तीन जणांना बालनिरीक्षणगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
समीर रॉय चौधरी (वय ७७, रा. औंध) यांच्या मेंदूला गंभीर जखम झाली होती, तर श्रेयस सतीश शेट्टी ( ३०, रा. औंध रस्ता) आणि रामसोबितकुमार ठक्कू मंडल ( ३८, रा. परिहार चौक, औंध) जखमी झाले. श्रेयस शेट्टी यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले, तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एका अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून, त्यामध्ये या अल्पवयीन मुलाला मार्च ते मे दरम्यान बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. तेथून सुटल्यावर त्याने हा दुसरा गुन्हा केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…
मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

