
Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…
पुणे: पुणे शहरातील एका युवतीने रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे.
पुणे शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही युवती स्टंट करत आहे. युवती उंचावरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका युवकाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. या स्टंटचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामनसुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे. तो वरती थांबला असून युवतीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, तो आता व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रील का चक्कर… मूर्खपणाचा कळस आहे फक्त.. सुरक्षा, काळजी ह्याबद्दल ह्यांनी कधीच वाचले नसेलच…!
स्थळ -अंदाजे दरीपूल, पुणे असावे!!! pic.twitter.com/WS67fw1XUf
— Moonfires.com (@moonfirescom) June 19, 2024
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका २३ वर्षीय युवतीला रिल बनवणं जीवावर बेतले आहे. दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ कार दरीत कोसळून युवतीचा मृत्यू झाला. श्वेता दीपक सुरवसे असे या युवतीचे नाव आहे. तिला मोटार चालवता येत नव्हती.
क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…
Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…
पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…
अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

