
Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
अहमदनगर हादरलं! आईने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या दोन मुलांना शेततळ्यात बुडवून मारलं
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदाधिकाऱ्याचा फिल्मी राडा
सोलापूर : सोलापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राडा झाला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या कार्यालयाचे गेट तोडून गाडी घुसवून धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या कार्यालयाच्या गेटवर गाडी घुसवतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मनसेचं पुन्हा खळ खट्टॅक! मराठी गाणं न लावल्याने चहावाल्याला चोप
नवी मुंबई : चहाच्या दुकानात मराठी गाणं लावण्यास नकार दिल्याने ऐरोलीत मनसे कार्यकर्त्यांनी चहावाल्याला चोप दिला आहे. ऐरोली सेक्टर तीन परिसरात हा प्रकार घडला आहे.
पुणे शहरात 40 सेकंदात केली चोरी
पुणे : एका चोराने तीन मिनिटांची रेकी केली आणि पीजीवर राहणाऱ्या पोरांना गंडा घातल्याची घटना हडपसर भागात घडली. मोबाईल, लॅपटॉप, 51 हजारांची रोख रक्कम या चोरट्याने अवघ्या 40 सेकंदात लंपास केली.
नागपूरमध्ये आढळला एअर फोर्समधील कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृतदेह
नागपूर : नागपूरमधील सेमिनरी हिल्स परिसरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एअर फोर्समध्ये नोकरीवर असलेला कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचा हा मृतदेह आहे. दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक गजभिये आणि विद्या गजभिये अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत.
नाशिकमध्ये १ लाख ६० हजार रूपये किमतीचे मॅफेड्रॉन जप्त
नाशिक : नाशिकमध्ये ३२ ग्रॅम वजनाचे व सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचे मॅफेड्रॉन शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हस्तगत केले आहे. या प्रकरणात एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे परिसरात दहशत पसरवण्यासाठी चार ठिकाणी गोळीबार
पुणेः मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे चेहऱ्याला मास्क लावून दुचाकीवरून फिरणाऱ्या सहा जणांनी चार ठिकाणी गोळीबार केला. ही घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली.
हरियाणामध्ये पत्नीने प्रियकरासाठी दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी
चंदीगडः हरियाणामध्ये तीन वर्षांपूर्वी विनोद बराडा नावाच्या एका व्यावसायिकाचा खून झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात तीन वर्षांनी पोलिसांना यश आलं आहे. या घटनेत मृताची पत्नीच मास्टरमाइंड असल्याचे तपासात उघड झाले आहे.
शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ: उच्च न्यायालय
बंगळुरू : पुरुष प्रसाधनगृहाच्या भिंतींवर विवाहित महिलेचा नंबर लिहून “कॉल गर्ल” लिहिणे हा लैंगिक छळ आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
तमिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने ३६ जणांचा मृत्यू
चेन्नई: तमिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला. तसेच ७० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुसरीकडे पुद्दुचेरी येथेही विषारी दारू प्यायल्याने १५ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यांतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

