पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…
पुणे : सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारच्या सुमारास गोपाळ कैलास मंडवे (वय 32) या युवकाचा खून झाला होता. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर (वय 19) याला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
गोपाळ मंडवे हे पुणे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कामाला होते. धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या खुनातील आरोपीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहेत. या खुनाचे कारण समोर आले असून अनैतिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गोपाळ मंडवे यांचा भाऊ योगेश कैलास मंडवे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी विरोधात 302 कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी सिद्धांत मांडवकर याचे गोपाळ मंडवे यांच्या नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याबाबत गोपाळ यांना माहिती मिळाली होती. त्यावरून दोघात वाद सुरू होते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठीच आरोपी आणि फिर्यादी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला आणि आरोपीने धारदार हत्याराने वार करून गोपाळचा खून केला होता.
आरोपी खून केल्यानंतर पसार झाला होता. पण, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…
पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…