
पुणे शहरातील फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी चोरी करणा-या एकास फरासखाना पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफिने अटक केली. तपासा दरम्यान ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम वजनाची चांदीची विट, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५५,०००/- रु रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली सुझुकी ( बर्गमॅन) कंपनीची गाडी, लोखंडी कटावणी असा सर्व मिळुन ४,५७,२०० /- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, गुन्हयाची उकल करण्यात यश आले आहे, अशी माहिती फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली.
फरासखाना पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक ०३/११/२०२४ रोजी दिवसा घरफोडी चोरी झाल्यानंतर, फरासखाना पोलिस स्टेशन येथील प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे तसेच तपास पथकातील पोलिस अमंलदार यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सुचना दिल्यानंतर व तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे, तसेच पोलिस अमंलदार नितीन तेलंगे, वैभव स्वामी, प्रविण पासलकर, महेश राठोड, गजानन सोनुने, संदिप कांबळे यांनी घटनास्थळाचे तसेच आरोपीने वापरलेल्या गाडीचा माग काढला. सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषन द्वारे सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी रय्यान ऊर्फ फइम शेख व त्याचे वडील असे दोघांनी लाल रंगाची बर्गमॅन गाडीवर येवून केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.
तपास पथकातील पोलिस अमंलदार प्रविण पासलकर, गजानन सोनुने व महेश राठोड यांचे गोपनीय बातमी वरुन, दिनांक १५/११/२०२४ रोजी ढमढेरे गल्ली, बुधवार पेठ पुणे येथुन तपास पथकातील पोलिस स्टाफचे मदतीने आरोपी फैय्याज राज मोहम्मद शेख (रा. सत्यानंद नगर, मिठा नगर, कोंढवा खुर्द पुणे) यास अटक करुन, पोलिस कस्टडी दरम्यान फरासखाना पोलिस स्टेशन कडील एक गुन्हे उघडकीस आणुन ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम वजनाची चांदीची विट, १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ५५,०००/- रु रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली सुझुकी (बर्गमॅन) कंपनीची गाडी, लोखंडी कटावणी असा सर्व मिळून ४,५७,२००/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे. दाखल गुन्हयाचा तपास अरविंद शिंदे, पोलिस उप-निरीक्षक हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक, प्रशांत भस्मे, पो. नि. (गुन्हे) अजित जाधव, स. पो. नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौज मेहबुब मोकाशी, पोलिस अमंलदार, प्रविण पासलकर, गजानन सोनुने, महेश राठोड, वैभव स्वामी, तानाजी नागंरे, नितीन तेलंगे, संदिप कांबळे, विशाल शिंदे, किशोर शिंदे, नितीन जाधव, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…
पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…
दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाकडून वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड…
पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…

