
पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…
पुणे: पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेने तीन वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. देशी हातबनावटीचे पिस्टल बाळगणारा, रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुन्हेगारास व खंडणी व सावकारीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद केले आहे.
देशी हातबनावटीचे पिस्टल बाळगणारा जेरबंद…
पुणे शहरात परिमंडळ १,२ व ३ पोलिस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलिस अंमलदार ८३८३ श्रीकांत दगडे व पोलिस हवालदार ५७४ दत्तात्रय पवार यांना भुमकर चौकाकडुन स्वामीनारायण मंदीराकडे जाणाया सर्व्हिस रोडलगत साई पॅलेस लॉजच्या पुढे काही अंतरावर एक इसम उभा असुन त्याचेजवळ एक पिस्टल आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदर बातमीप्रमाणे खात्री झाल्याने स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली.
केशव अशोक राठोड (वय २५ वर्षे, धंदा- ग्राफिक डिझायनर, रा. घर नं २२३, चरवड वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे) याच्या अंगझडतीत एक देशी हातबनावटीचे पिस्टल व १ जिवंत राऊंड असा एकुण किं रु ४०,२००/- चा अग्निशस्त्र असलेला माल विना लायसन्स व बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना मिळून आला. म्हणून त्याचेविरुध्द आंबेगाव पोलिस स्टेशन येथे आर्म अॅक्ट कलम ३ सह २५ व महा पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुन्हेगारास केले जेरबंद…
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार हे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलिस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील व पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ३ यांनी तडीपार केलेला आरोपी पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव (रा. कांबळे चाळ, आंबेडकर चौक, वारजे जकात नाका, पुणे) हा त्याचे रहाते घराजवळ येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी वपोनि, नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी स्टाफला रवाना करुन तडीपार आरोपी मिळुन येतो अगर कसे? मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
सदर बातमीची स्टाफची खातरजमा झाल्याने स्टाफने वरील ठिकाणी जावुन खात्री केली. पियुष ऊर्फ कान्हा सतिश जाधव (वय- २० वर्षे, रा. कांबळे चाळ, आंबेडकर चौक, वारजे जकात नाका, पुणे) याला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तडीपार आरोपी पुणे शहरामध्ये येण्यासाठी कोणत्या पोलिस अधिकारी किंवा न्यायालयाची पुर्व परवानगी घेतली आहे का? याबाबत विचारणा केली असता त्याने मी कोणत्याही पोलिस अधिकारी व संबधित न्यायालयाची पुर्व परवानगी घेतली नसल्याचे सांगुन, तसेच त्यास पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात येण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागल्याने त्याबाबत स्टाफने वारजे पोलिस स्टेशनकडील सदर इसमाचा तडीपार केलेला आदेश प्राप्त करून घेवुन तशी स्टाफची खात्री झाल्याने सदर तडीपार आरोपी विरुध्द वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ४५२ /२०२४, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर उत्तमनगर, वारजे व हिंजवडी पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
खंडणी व सावकारीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद…
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील अंमलदार हे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करीत असताना गस्ती दरम्यान पोलिस नाईक ७५५९ रविंद्र लोखंडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खडक पोलिस स्टेशन, गुन्हा रजि नं २४०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३)(४) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९,४५ मधील निष्पन्न पाहिजे आरोपी नविद मुक्तार शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) हा त्याचे रहाते घराजवळ असलेले आयशा जनरल स्टोअर्स, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने सदरची बातमी वपोनि, नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी स्टाफला रवाना करुन नमुद पाहिजे आरोपी मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
प्राप्त बातमीचे अनुषंगाने स्टाफने आयशा जनरल स्टोअर्स, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे जावुन पाहिजे आरोपी याचा शोध घेतला असता तो सदर ठिकाणी मिळुन आला. नविद मुक्तार शेख (वय – ३३ वर्षे, रा. ७८ / बी, कासेवाडी, १० नं कॉलनी, भवानी पेठ, पुणे) असे त्याचे नाव आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरापीकडे वरील दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता तो दाखल गुन्ह्यामध्ये निष्पन्न असल्याचे कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईकरीता खडक पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), निखिल पिंगळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे १) व नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस उप निरीक्षक, शाहीद शेख, पोलिस हवालदार दत्तात्रय पवार, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, पोलिस नाईक रविंद्र लोखंडे, पोलिस अंमलदार श्रीकांत दगडे, महेश पाटील, साईकुमार कारके, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…
पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…
पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…

