
पुणे शहरातील रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1ने केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 1 वर्षापासून पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 यांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1च्या पथकाकडील अधिकारी व अंमलदार असे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गस्त घालत होते. गस्ती दरम्यान स्टाफमधील पो.अं. 8742 महेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड पो.स्टे. गु.र.नं 443/2023,भा द वि.क. 307, 326, 506, 34 व मुं.पो.का. क. 37(1) सहा 135 या दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी स्वप्निल संतोष काळे (वय-20 वर्षे, रा. जांभूळवाडी, पुणे) हा सिटी प्राईड थेटर समोर कोथरूड, पुणे येथे काम करीत आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वपोनी नंदकुमार बिडवई यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावून पाहिजे आरोपी मिळून येताच त्यास ताब्यात घेऊन कारवाई करणेबाबत मौखिक आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने अधिकारी API प्रविन काळुखे व स्टाफ असे बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचून त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. सदर आरोपी हा पुणे शहराच्या रेकॉर्डवरील असून त्याने वरील नमुद गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यास पुढील कारवाईकरिता सिंहगड रोड पो.स्टे. पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे 1 गणेश इंगळे व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 चे प्रभारी अधिकारी वपोनि नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पथकाकडील सपोनि प्रवीण काळूखे, पोहवा प्रदीप राठोड, पोहवा गणेश ढगे, अजित शिंदे, पो अं. महेश पाटील, अमित गद्रे, साईकुमार कारके, नारायण बनकर, श्रीकांत दगडे यांनी केली आहे.

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…
पुणे पोलिसांनी चुहा गँगचा कुख्यात टोळीप्रमुख व त्याच्या साथिदारांना हत्यारांसह केले जेरबंद…
Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…
पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

