
मुंढवा पोलिसांनी खुनातील आरोपीस एक तासाच्या आत केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगीरी केली असून, एक तासाच्या आत खुनातील आरोपीस जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
दिनांक १०/०६/२०२४ रोजी रात्रौ ००.०० वा. मुंढवा मार्शल वरील कर्मचारी यांना आनंद निवास, कामगार मैदान जवळ, अर्धवट बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये एक व्यक्ती जखमी आवस्थेत पडला असल्याचा कॉल नियंत्रण कक्ष येथून प्राप्त झाला होता. सदर कॉल प्राप्त होताच मुंढवा पोलिस स्टेशन कडील रात्रगस्त अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदरची परिस्थीती पाहुन जखमी व्यक्तीची महिती घेण्यास सुरवात केली असता. सदर जखमी व्यक्तीचा भाऊ नामे संतोष निवृत्ती अल्हाट यांनी जखमी हा त्याचा भाऊ असून त्याचे नाव श्रीकांत निवृत्ती अल्हाट (वय ४२) असे असल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तात्काळ जखमी व्यक्तीस अॅब्युलन्सने पुढील औषध उपचार कामी ससुन हॉस्पीटल येथे घेवून आले. परंतु श्रीकांत निवृत्ती अल्हाट हा उपचार पुर्वी मयत झाल्याचे ससुन हॉस्पीटल डॉक्टरांनी घोषीत केले. त्यांनतर श्रीकांत अल्हाट याचे ससुन डेड हाऊस येथे पोस्ट मॉर्टेम होऊन त्याचे मरण हे डोक्याला गंभीर जखम व अंगावर इतर ठिकाणी जखमा होवुन मयत झाल्याचे निष्पण झाले. सदर बाबत मुंढवा पोलिस स्टेशन पुणे येथे अ. मतय रजि. नं ७६ / २०२४, सी. आर. पी. सी कलम १७४ अन्वये दाखल करण्यात आले.

सदर प्रकाराबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना माहिती मिळताच बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास दरम्यान श्रीकांत निवृत्ती अल्हाट हा दिनांक ९/०६/२०२४ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास श्रीकांत हा त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे कडे पाणी मागण्यासाठी गेला असता त्यावेळी राकेश व श्रीकांत यांच्या मध्ये वादीवाद होवुन भांडणे सुरु झाली त्याच भांडणामध्ये राकेश गायकवाड यांनी श्रीकांत अल्हाट यास सिमेंटच्या दगडाने व विटेने व लोखंडी गजाने मारले अशी माहिती मिळाली. मयत श्रीकांत निवृत्ती अल्हाट याचा भाऊ संतोष निवृत्ती अल्हाट याने त्याचा मामे भाऊ राकेश तुकाराम गायकवाड याचे विरुध्द खुनाची तक्रार दिल्याने मुंढवा पोलिस स्टेशन येथे २४३ / २०२४, भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल होताच. मुंढवा पोलिस स्टेशन कडील एकुण ३ पथके व तपास पथक मधील अधिकारी व अंमलदार यांनी ०१ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी राकेश तुकाराम गायकवाड याचे मुसक्या आवळुन त्यास जेरबंद केले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, पोलिस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर, अपर पोलिस आयुक्त, प्रविण पाटील, पश्चिम प्रादेशिक विभाग अतिरिक्त कार्यभार पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, यांचे सुचना प्रमाणे, पोलिस उप आयुक्त, आर राजा, परिमंडळ-५, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा परिमंडळ ५ पुणे शहर, सहा पोलिस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनखाली, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलिस निरीक्षक संजय माळी, पो उप निरीक्षक अनिल बिनवडे, पो उप निरीक्षक महादेव लिंगे म पो उप निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलिस अंमलदार संतोष जगताप, तुळशीराम रासकर, दिनेश भांदुर्गे, राजु कदम, दत्ताराम जाधव, रविंद्र देवढे, योगेश गायकवाड, जगदिश महानोर, किरण बनसोडे, राहुल मोरे, सचिन पाटिल, स्वनिल रासकर, निलेश पालवे, दयानंद गायकवाड, यांनी केली आहे.
पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
पुणे शहरात पत्नीच्या दुसऱ्या पतीचा कुटुंबियांसमोरच केला खून…
पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…