
धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून एका सात वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह झुडपामध्ये आढळून आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत यांच्या सात वर्षीय मुलाचे तीन दिवसांपूर्वी अज्ञाताने अपहरण केले होते. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 7 वर्षीय बालकाचा झूडपात मृतदेह आढळून आला आहे. या बालकावर अत्याचार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावात बंद पुकारण्यात आला असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
चिमुकला स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनासाठी शाळेत गेला होता, तेंव्हापासून तो बेपत्ता होता, त्याचा शोध घेतला जात असताना त्याचा मृतदेह गावाजवळ असलेल्या झूडपात आढळून आला. हा चिमुकला एका युवकासोबत जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला होते. त्या आधारे आता पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, लहान मुलाला एका मंदिराजवळून आपल्या मागे येण्याचा युकवकाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आज बालकाचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये चोरांनी दिले थेट पोलिसांनाच आव्हान…
नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…
नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला…
नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…
नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…
नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…

