हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणेः टोळी प्रमुख पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे व त्याचे इतर ०४ साथीदार यांच्याविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी तर पुणे पोलिसांची नवीन वर्षात 15 वी मोका कारवाई आहे.

१) पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन फिर्यादी हे  २५/१२/२०२२ रोजी पाच अनोळखी जणांनी फिर्यादी यांचे घरात घुसुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय, त्यांच्या गळयाला चाकू लावून, शिवीगाळ करून ‘आवाज मत करो, नहीं तो जान से मार दुंगा, तुम्हारे पास जो कुछ हैं, वो चुपचाप निकाल के दे दो…’ असे बोलून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, फिर्यादी यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १४,६५० /- रुपये किंमतीचा ऐवज जबरी चोरी करुन घेऊन गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने त्यांचेवर हडपसर पोलिस स्टेशन
गु.र.नं. १६/२०२३, भादवि कलम ३९५, ३०७,५०४, ५०६, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५, क्रिमीनल अॅम क.७ तसेच सदर कलमा मध्ये ३९७ प्रमाणे वाढ करून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासा दरम्यान यातील आरोपी
१ ) पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे, वय २४, रा. बंटर शाळे जवळ, गाडीतळ हडपसर, पुणे ( टोळी प्रमुख)
२) स्वप्निल ऊर्फ बिट्या संजय कुचेकर, वय-२२, रा. मांजरी, ता. हवेली, जि. पुणे
३) राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड, वय १८ वर्षे, रा. केनॉल शेजारी, तुळजाभवानी वसाहत, हडपसर पुणे
४) आकाश ऊर्फ आक्या गोविंद शेंडगे, वय २०, रा. के. के. घुले शाळे समोर, मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे
५ ) एक विधीसंघर्षित बालक (टोळी सदस्य)
यापैकी आ.क्र.१ ते ४ यांना अटक करण्यात आली असून, अ. क्र. ५ यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपी पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून, स्वतःची संघटीत टोळी तयार करून, अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाकदपटशहा दाखवुन, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर प्राणघातक हत्यारे जवळ बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी विक्रांत देशमुख, पोलिस उप-आयुक्त, परि-५, पुणे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजन शर्मा यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १६/२०२३, भादविकलम ३९५,३०७,५०४,५०६, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३)१३५, क्रिमीनल अॅम क.७ तसेच सदर कलमा मध्ये ३९७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची  अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर,  रंजन शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलिस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, बजरंग देसाई हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजन शर्मा, पोलिस उप-आयुक्त, परि-५, पुणे, विक्रांत देशमुख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, बजरंग देसाई यांचे मार्गर्शनाखाली हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), दिगंबर शिंदे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), विश्वास डगळे, तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक,बर्गे, पोलिस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, हडपसर गुन्हे शोध पथक व निगराणी पथकातील पोलिस अंमलदारा यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीवे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १५ वी कारवाई आहे.

‘पोलिसकाका विशेषांक’

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!