पोलिसकाकाला चोरांनी टोचलं इंजेक्शन अन् झाला मृत्यू…

मुंबई : पोलिस चोरांना पकडण्यासाठी गेले असताना चोरांनी मिळून पोलिसकाकाला विषारी द्रव्याचे इंजेक्शन टोचले. पोलिसाची प्रकृती बिघडत गेल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली. पोलिसांनी आता या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार (रा. ठाणे) हे वरळीत तैनात होते. २८ एप्रिलला चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरांनी त्यांना विषारी द्रव्याचं इंजेक्शन दिल्यामुले प्रकृती बिघडत होती. तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, विशाल पवार लोकल रेल्वेने सिव्हील कपड्यात ड्युटीवर जात होते त्यावेळी ही घटना घडली. ट्रेन माटुंगा आणि सायन परिसरात रात्री साडेनऊ वाजता स्लो झाली तेव्हा प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर मारले.

विशाल पवार यांच्या हातातून फोन निसटला आणि तो फोन उचलून चोर पळाले. लोकल स्लो असल्याने विशाल पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. पण काही अंतरावर चोरांच्या साथीदारांनी त्यांनाच घेरले. विशाल पवार यांनी विरोध करताच त्यांना मारहाण केली. यावेळी मागून कुणीतरी विशाल पवार यांना विषारी इंजेक्शन टोचले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन् बसला धक्का…

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…

पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!