पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहिर…
पुणे: पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना शुक्रवारी (ता. २६) सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना आज (ता. २५) सकाळी सुट्टी जाहिर केली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन, पालक व विद्यार्थ्यांना वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक पालकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ झाली. यामुळे उद्याची सुट्टी आजच जाहिर करण्यात आली आहे.
पुणे हवामान विभागने पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला होता. बुधवारी (ता. २४) रात्रीपासून पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरातील डेक्कन भागात पावसाने तीन युवकांचे बळी घेतले आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पुणे शहरात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले. खडवासला धरणआतील 40 हजार क्युसेकचा विसर्गामुळे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. पुणे शहर आणि परिसरात आजही दिवसभर पाऊस सुरू आहे. यामुळे पुण्यातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले. गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. शेकडो लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. पुण्यात बचावकार्यात रस्त्यावर बोटी चालवण्याची वेळ आली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता.
ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, मुळशी तहसीलमधील ताम्हिणी घाटात एका छोट्या भोजनालयावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस रस्त्यावरील ढिगारा हटविण्याचे काम करत असून, ते हटवल्यानंतर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे लवासा परिसरातील एका बंगल्यात तीन जण चिखलात अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट…
खेड, जुन्नर, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ, भोर, हवेली तालुके आणि पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर परिसरातील ‘घाट’ (डोंगरातील खिंडी) विभागातील अतिवृष्टीचा विचार करून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या टीम सखल भागात तैनात करण्यात आल्या आहेतय जेथे पूर आणि पूर येण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचे आवाहन दिवसे यांनी केले. आयएमडीने पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. विनाकरण घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
पोलिसकाका Video News: २५ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी…
पुणे शहरातील सर्व शाळांना व पुणे जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यातील शाळांना उद्या दि. २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी असल्याचे आजच आदेश निर्गमीत करावेत व त्या आदेशाला प्रशासनामार्फत व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्वांना कळविण्यात यावे असे पत्र जिल्हाधिकारी, पुणे यांना सादर केले.… pic.twitter.com/Cc6c8bGsee
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 25, 2024