शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुणे: शिल्पा गवारे यांचा हुंड्यासाठी बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे. शिल्पाच्या मृत्यूच्या घटनेने कलाटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जाण्याने आणि पतीच्या अटकेनंतर त्यांच्या दोन मुलांचे भविष्य अंधारात गेले आहे. याप्रकरणी, शिल्पाच्या नंदणेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी, शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राज्यभर गाजलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर आता पिंपरी चिंचवडमधील या हुंडाबळीच्या घटनेने शहर हादरले आहे.

शिल्पा या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांची नणंद होत्या. मुख्यमंत्र्यांनी स्नेहा कलाटे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांना आश्वस्त केले. गेल्या दीड वर्षांतील ही दुसरी घटना आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

वाकडमधीलचं गवारे कुटुंबीयांनी शिल्पाचा अमानुष छळ केला. पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांनी सतरा वर्षांपासून शिल्पाचा छळ केला आहे. दोन एकर जमीन, व्यवसायात हातभार आणि वारंवार लाखो रुपयांची मागणी करण्यात येत होती. मात्र तरीही गवारे कुटुंबीयांचा हव्यास संपला नाही. लग्नापूर्वीचा हत्येचा गुन्हा लपवून कलाटे कुटुंबीयांची गवारेंनी फसवणूक केली. तर लग्नानंतर पैशाचा हव्यास सुटला. लेक सुखी राहील म्हणून कलाटे कुटुंबीय देत गेले. तरीही छळ थांबेना म्हणून आई-वडील आणि भावांनी शिल्पाला माहेरी येण्याची विनवणी केली. मात्र, कुटुंबाचा विचार करून ती सासरीच राहिली. तथापि, मनातल्या वेदनांचा अंत झाला आणि तिने टोकाचे पाऊल उचचले. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप कलाटे कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी, वाकड पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला असून पती, सासू, सासरे आणि दिराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरु केला असून, शिल्पाने गळफास घेतला तेव्हा तिच्या बेडरुमचे दार उघडे होते. वेळ मध्यरात्री दीड वाजताची होती. मग, पती सचिन घरात असताना तो बेडरूममध्ये का नव्हता? पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यातही ते समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होता, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं खळबळ उडाली. आता शिल्पाच्या प्रकरणात पती, सासू-सासरे आणि दिराला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मोठा खुलासा समोर…

प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…

पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…

पुणे! पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी अन् संशयाचं घुसलं भूत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!