पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याची मागणी…

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी (ता. 29 ऑक्टोबर) पोलिस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परंतु, त्याच दिवशी नगरपरिषद भरती परीक्षा आणि महाज्योती मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग प्रशिक्षणार्थ्यांसाठीची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे.

तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आल्यामुळे परीक्षार्थींना 2 परीक्षांना मुकावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार विलास पोतनीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक परीक्षार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विभागाकडून जाहीर करण्यात असलेल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांचा अर्ज एक संधी म्हणून लाखो परीक्षार्थी भरतात. परंतु या स्पर्धा परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास परीक्षार्थींना केवळ एकाच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाता येते. 29 ऑक्टोबर रोजी या तिन्ही परीक्षा एकत्र होणार असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे या परीक्षार्थींसमोर निर्माण झालेला या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी आणि नगरपरिषद परिषद भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात यावे, अशी मागणी आमदार विलास पोतनीस यांनी केली आहे.

वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!

पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…

पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!