महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मुंबईः महाराष्ट्र राज्य पोलिस दलात सध्या बंपर भरती सुरु असून, या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. पोलिस भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पोलिस भरतीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणेः
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 5 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 एप्रिल 2024
रिक्त पदांची संख्या : 17471
रिक्त पदे :
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅन्डसमन पदांवर भरती करण्यात येणार आहे.

वयाची अट :
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात भरतीसाठी अर्ज दाखल करण्याऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवाराने अधिकृत अधिसूचना वाचावी.

अर्जाची फी :
महाराष्ट्र राज्य पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गातील उमेदवाराला अर्ज शुल्कात 100 रुपये सूट मिळेल, त्यामुळे 350 रुपये अर्जाची शुल्क भरावे लागेल.

पोलिस भरती शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र राज्य पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने बारावी उत्तीर्ण असणे किंवा त्या समकक्ष पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यात होणार पोलिस भरती:
बृहन्मुंबई
ठाणे
पिंपरी-चिंचवड
मिरा-भाईंदर
नागपूर
नाशिक
नवी मुंबई
अमरावती
सोलापूर
छत्रपती संभाजीनगर
लोहमार्ग-मुंबई
ठाणे ग्रामीण
रायगड
पालघर
सिंधुदूर्ग
रत्नागिरी
नाशिक ग्रामीण
अहमदनगर
जळगाव
धुळे
नंदुरबार
कोल्हापूर
पुणे ग्रामीण
सातारा
सांगली
सोलापूर ग्रामीण
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
जालना
बीड
धाराशिव
नांदेड
लातूर
परभणी
चंद्रपूर
नागपूर
भंडारा
वर्धा
गडचिरोली
गोंदिया
अमरावती
अकोला
वाशिम
बुलढाणा
यवतमाळ
लोहमार्ग-पुणे
लोहमार्ग औरंगाबाद

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!