पुणे शहरात तडीपार आरोपीकडून दुचाकी केली जप्त; पाहा दुचाकीचा क्रमांक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेने तडीपार आरोपीकडून ०१ दुचाकी गाडी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी ऑल आऊट / कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणेबाबत सांगितले होते. त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रविण काळुखे, पोहवा ६९२९ गणेश ढगे, पोहवा ४२११ अजित शिंदे, पोहवा ७५५९ रविंद्र लोखंडे, पोलिस अंमलदार ८७७० अमित गद्रे व पोलिस अंमलदार ८७४२ महेश पाटील असे पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत गस्त करीत असताना गस्ती दरम्यान स्टाफमधील पोलिस अंमलदार ८७७० अमित गद्रे व पोलिस अंमलदार ८७४२ महेश पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील व सध्या तडीपार असलेला सोहम प्रकाश डोंगरे (सध्या रा. गणराज सहकारी गृहरचना सहकारी संस्था मर्यादित बिल्डींग, फ्लॅट नं २, विटभट्टी शेजारी, पाषाण, पुणे व मुळ रा. स.नं. ०१, पाषाण भाजी मंडई समोर, सहानी इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर, सावकार चाळ, संभाजी चौक, पाषाण गाव, पुणे) हा त्याचे सध्या राहते घरी येणार असलेबाबतची खात्रीशीर बातमी प्राप्त झाली होती.

बातमीचे अनुषंगाने नमुद अधिकारी व स्टाफ असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचुन बातमीतील नमुद वर्णनाचा तडीपार इसम हा त्याचे रहाते घर फ्लॅट नं २, गणराज सहकारी गृहरचना सहकारी संस्था मर्यादित बिल्डींग, विटभट्टी शेजारी, पाषाण, पुणे येथे एका मोपेड गाडीसह उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या वेस्पा मोपेड गाडीचा नंबर हा बनावट असल्याचा संशय आल्याने नमुद मोपेड गाडीचे चॅसि नं MET00005A2J021310 वरुन माहिती घेतली असता नमुद वेस्पा मोपेड गाडीचा मुळ आरटीओ नंबर MH12UY0666 असा आल्याने सदर गाडीचे कागदपत्रांबाबत विचारणा केली असता सदरची मोपेड गाडी ही त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित गाडीबाबत माहिती घेतली असता वाकड पोलिस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे गुन्हा रजि नं ७०८/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. सदरची मोपेड गाडी किं.रु. ४५,०००/- असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपी विरोधात चतु:श्रुंगी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०० / २०२५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील कारवाईकरीता चतु:श्रुंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलिस आयुक्त गणेश इंगळे, गुन्हे शाखा १, पुणे शहर व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली प्रविण काळुखे, पोलिस हवालदार गणेश ढगे, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, अमित गद्रे, महेश पाटील, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ केले जप्त…

पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…

पुणे पोलिसांच्या ‘तरंग’ कार्यक्रमाला लागली नाराजीची किनार…

पुणे शहरात दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह केली अटक…

पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!