
तेजस्विनी तुळशीला दिवा लावून घरात गेली अन्…
छत्रपती संभाजीनगर : युवतीने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी विष्णू जोशी (वय 20) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे. तेजस्विनीचे वडील कंपनीत काम करतात. तर आई घरी खाजगी शिकवणीचे क्लास घेते. तिला एक भाऊ आहे. तेजस्विनी हिने बारावीनंतर नीटची परीक्षा दिली. मात्र त्या परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले. यामुळे तिने यावर्षी पुन्हा नीटच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. बुधवारी तिचे वडील कंपनीत कामासाठी गेले होते. आई घरीच होती.
तेजस्विनीने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुळशीला दिवा लावला. आई शिकवण्याचे क्लास घेत होती, यावेळी ती रूममध्ये गेली. काही वेळाने आईने तिला आवाज दिला, मात्र तिचा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत पाहिले असता तेजस्विनीने ओढणीने गळफास घेतला होता. तिला तात्काळ खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
तेजस्विनीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक जाधव करत आहेत.
मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…