‘लेडी बॉस’चे कर्मचाऱ्यासोबत संतापजनक कृत्य…
अहमदाबाद (गुजरात) : एका कामगाराने पगार मागितला म्हणून कंपनीच्या मालकिणीने त्याला स्वतःच्या पायातले सँडल तोंडाने उचलण्याची अपमानास्पद शिक्षा दिली. तसेच त्याला माफीदेखील मागण्यास सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी महिला उद्योजिकेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विभूती पटेल असे गुन्हा दाखल झालेल्या महिला उद्योजिकेचे नाव आहे. ती रानीबा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची मालकीण आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला विभूती हिने टाइल्स विक्रीसाठी नीलेश दलसानिया (वय 21) नावाच्या व्यक्तीला 12 हजार रुपयांच्या मासिक वेतनावर कामावर ठेवले होते. युवकाने पूर्वी या महिलेच्या कंपनीत 15 दिवस काम केले होते. युवक विभूतीकडे पगार मागण्यासाठी गेला, तेव्हा तिने त्याला सँडल तोंडाने उचलायला सांगून माफी मागण्यास सांगितले. ही घटना मोरबी शहरात बुधवारी (ता. 22) घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
युवकाच्या तक्रारीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी या महिला उद्योजिकेने दलसानियाला अचानक कामावरून काढून टाकलं. त्यावर दलसानियाने 16 दिवस केलेल्या कामाचा पगार मागितला, तर त्यावर स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही. तसंच त्याला फोन कॉलवरही उत्तर देणे या उद्योजिकेने बंद केले होते. त्यानंतर नीलेश कार्यालयात गेला असता विभूती पटेल हिने नीलेशला कानशिलात लगावली आणि औद्योगिक क्षेत्रात फरशीवरून फरपटत नेले. तसंच या प्रकरणातील अन्य आरोपी परीक्षित पटेल, ओम पटेल यांच्यासह सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी नीलेशला पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या महिला उद्योजिकेने नीलेशला ‘रावापार चौकात परत दिसलास तर जीवे मारू,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींनी एक व्हिडिओदेखील शूट केला. त्यात ‘मी पैसे वसूल करण्यासाठी विभूती यांच्या कार्यालयात गेलो’ असे सांगण्यास भाग पाडले आहे.
पीडित नीलेश दलसानियाने तक्रार दाखल केली असून, त्याआधारे मोरबी शहरातल्या ए डिव्हिजन पोलिसांनी आरोपी महिला विभूती पटेल उर्फ राणीबा आणि तिचा भाऊ ओम पटेल यांना अटक केली आहे. व्यवस्थापक परिक्षित आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…
Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!