
परभणीतील एकाच कुटुंबातील तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गुढ उकलले; धक्कादायक माहिती समोर…
परभणीः परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून सामूहिक आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करताना या घटनेमागील गूढ अखेर उलगडले आहे.
मृत युवतीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेल, अशी आरोपीने धमकी दिली होती. धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षकी पेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळले. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी युवका विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी-कद्दू येथील रहिवासी होते. या तिघाच्या आत्महत्येमुळे तुडमे याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. या तिघांच्या मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिघांच्या सामूहिक आत्महत्येनंतर तर्कवितर्क लावण्यात आले. याप्रकरणी मसनाजी यांचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (वय २१, रा परभणी) याच्या विरोधात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना आरोपीच्या मोबाइल सीडीआरवरून संशय बळावला होता. चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस आणि कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व्हायरल केल्याचे कबूल केले. यावरून ४ डिसेंबरला रात्री गंगाखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…
सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…
पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…
पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…
मुळशी हळहळली! विवाहापूर्वी पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू…

