फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…

सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर युवतीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी काल (ता, २६) पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा एक आरोपी PSI गोपाळ बदने हा बनकरच्या अटकेनंतर रात्री उशिरा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. आरोपी प्रशांत बनकर याच्या घरातील वरच्या मजल्यावरती डॉक्टर महिला राहत होती. महिला ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला कुलूप लावले होते. आत्महत्येपूर्वी आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर युवतीमध्ये वाद झाला होता. या वादानंतर प्रशांत बनकरने तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे म्हटल्याची माहिती पुढे आली आहे. फ्लॅट बंद असल्यामुळे ऐनवेळी कुठं जायचं म्हणून महिला डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. मानसिक तणावात असणाऱ्या डॉक्टर युवतीने यासंदर्भात पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना वारंवार कॉल केले होते, अशी माहिती माहिती समोर आली आहे.

डॉक्टर युवती गेल्या आठ महिन्यांपासून प्रशांत बनकर याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. २३ तारखेला पहाटे १.३० वाजता महिला डॉक्टरने फलटण येथील मधूदीप हॉटेल मध्ये “चेक इन” केलं होतं. यावेळी डॉक्टरने हॉटेलची रूम २ दिवसांसाठी बुक केली होती. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना डॉक्टर युवतीसोबत कोणी नव्हतं. डॉक्टर, पीएसआय बदने आणि बनकर यांच्यात अनेक कॉल झाले. दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे २३ तारखेला संध्याकाळी ४ वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले त्यावेळी डॉक्टर युवतीचा मृतदेह आढळला.

सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी डॉक्टर युवतीने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रशांत बनकरच्या आईने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितल की, माझ्या मुलाने त्या डॉक्टर युवतीला कसलाही त्रास दिलेला नाही. हातावर पेनाने कोणी लिहिलं की डॉक्टर मॅडमनी लिहिलं याचा संपूर्ण तपास व्हावा. आम्हाला शंका आहे. डॉक्टर मॅडमनी आमच्या मुलाचं नाव कसं काय घेतलं. डॉक्टर मॅडम आमच्या मुलाला दादा म्हणायच्या तो इथे राहत पण नव्हता. तो फक्त शनिवारी रविवारी यायचा आणि कामाचा लोड असल्यामुळे तो इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष देत नव्हता. गोपाळ बदने याचं नाव देखील आम्ही कधी ऐकलं नसल्याचं बनकरच्या आई-वडिलांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना बघितलं होतं त्या मला सांगून गेल्या होत्या, काकू मी आधी राहत होते तिथे नाश्ता करण्यासाठी चालले आहे, असे त्यांनी मला सांगितलं. तिथेच त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जेवण केलं होतं मी त्यांना फोन केला होता जेवायला कधी येता म्हणून, तर त्या मला म्हणाल्या दुसऱ्या एका काकूंनी मला जेवायला बोलावलं आहे. त्या गेल्या आठवड्यात जरा टेन्शनमध्ये दिसत होत्या, आम्ही त्यांना स्वतःहून विचारलं तर त्या कधी सांगत नव्हता. काही वेळाने त्या परत आधी सारख्या नॉर्मल असायच्या. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बनकर परिवाराने केली आहे. तर आपला मुलगा निर्दोष असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सातारा! महिला डॉक्टरनं हातावर सुसाइड नोट लिहून संपवलं आयुष्य…

पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…

डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!