वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांना मारहाण करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर व त्यांचे सहकारी वनाजी बांगर यांना विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे मोठा सायकल वरून जात असताना ऋषी वरपे (रा. कळंब ता. आंबेगाव) व संतोष माशेरे (रा. एस कॉर्नर मंचर तालुका आंबेगाव) व इतर आठ अनोळखी जणांनी मोटर सायकल वरून येऊन बेकायदा गर्दी जमून हातात काठ्या घेऊन ‘वळसे पाटील साहेब व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधामध्ये आंदोलन करतो काय?’ असे म्हणत मारहाण केली होती. असे कृत्य पुन्हा केल्यावर तुला परत सोडणार नाही. अशा आशयाची धमकी देऊन मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा म्हणून विविध संघटनांनी आवाज उठविला होता.

मुलाला मारहाण झाल्याचे कळतात प्रभाकर बांगर यांचे वडील गोपाळा बांगर यांना मानसिक धक्का बसला व त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांचे नातू आकाश बांगर याचा जबाब मंचर पोलिसांनी नोंदवला आहे. शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश बालवडकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांनी दोशी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक तुरे करत आहेत.

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

पोलिस स्टेशन हद्दीतील भाडेकरूंची माहिती जमा करण्याचे आवाहन…

Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…

पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!