टेम्पोची विद्यार्थिनीला जोरात धडक; उपचारापूर्वीच मृत्यू…

सिंधुदुर्ग: दोडामार्ग झरेबांबर येथे दोडामार्ग ते बेळगाव मुख्य रस्त्यावर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला जोरात धडक दिली. या घटनेत श्रीया संदीप गवस (वय 7) हिचा मृत्यू झाला आहे.

श्रीया संदीप गवस हिला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने आणि चाक डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्या अवस्थेत तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वी तिचा दुदैवी मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला चोप दिला. नागरीकांनी घटना स्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले.

दरम्यान, श्रीया संदीप गवस हिचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीया हिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…

हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!