साखरपुड्याच्या एक दिवस अगोदर मुलगी गरोदर असल्याचे आले समोर…

रायगड: अलिबाग तालुक्यात अल्पवयीन मुलीवर गंभीर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन समीर नारायण नाईक (वय २०) याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

आरोपी आणि पीडित मुलीची नोव्हेंबर 2024 मध्ये ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. जानेवारी 2025 पासून आरोपीने मुलीच्या घरी तसेच पोयनाड येथील आदिवासी पाड्यात तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या कालावधीत मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती तिच्या पालकांना तसेच आरोपीला असूनही 08 जानेवारी 2025 रोजी साखरपुडा ठरवला होता. 24 फेब्रुवारी 2025 रोजी विवाह ठरवण्यात आला होता. तथापि आरोपीकडून लैंगिक संबंध सुरूच होते.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

07 जानेवारी 2026 रोजी पोटदुखीचा त्रास झाल्याने मुलीला रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आरोपी समीर नारायण नाईक यास 13 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) अधिनियम 2012 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS Act 2023) अंतर्गत दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दगू बाजीराव गांगुर्डे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

धक्कादायक! मठात राहणारी अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर…

दहावीत शिकणारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का; आरोपी निघाला…

हनिमूनच्या रात्री पत्नीने गरोदर असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!