आयपीएस वडिलांचा आदर्श! वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस…

हैदराबाद : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली वकिली सोडून ईशा सिंह या आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. त्यांचे वडील महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी निवृत्तीनंतर वकिली सुरू केली होती. वडिलांप्रमाणेच आयपीएस व्हायचे, असा निर्धार केलेल्या ईशा सिंह यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस ॲकॅडमीमध्ये ७५ आरआर बॅचची पासिंग आऊट परेड झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ईशा सिंह यांच्यासह अन्य आयपीएस अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला होता. वकिलीमध्ये उत्तम करिअर घडवू शकणाऱ्या ईशा सिंह यांना मात्र वडिलांप्रमाणे आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी वकिली सोडून आयपीएस होण्याकडे सारे लक्ष केंद्रित केले.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीमधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये ईशा सिंह यांनी प्लॅटून क्रमांक २चे नेतृत्व केले होते. ईशा सिंह यांनी बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली होती.

आयपीएस अधिकारी ईशा सिंह यांची आता अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम व केंद्रशासित प्रदेश (एजीएमयूटी) केडरमध्ये नियुक्ती झाली आहे. त्या म्हणाल्या, ‘माझे वडील वाय. पी. सिंह यांच्याप्रमाणेच मला आयपीएस अधिकारी व्हायचे होते. ते अतिशय कणखर व निष्पक्षपाती आहेत.’

तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…

पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!