पुण्यात एअर होस्टेस युवतीला लॉजवर घेऊन जात केला अत्याचार…

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात एका एअर होस्टेस युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित युवतीचे अनेक खासगी व्हिडीओज आणि फोटोज शूट केले होते. याच्या आधारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. शिवाय, आरोपीने पीडित युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित अश्लील फोटो घरच्यांना पाठवेन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून युवतीने पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल करत हे प्रकरण पुण्यातील वाकड पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित युवती (वय २१) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवली येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी एअर होस्टेसचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यातील वाकड परिसरात ती आपल्या एका मैत्रीणीसोबत राहत होती. यावेळी तिची ओळख मैत्रीणीचा भाऊ विजय आबासाहेब शिंदे या युवकासोबत झाली. काही दिवसांत दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपी युवकाने एअर होस्टेसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर जबरदस्तीने डांगे चौक येथील लॉजवर आणि रुमवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. शिवाय, त्याने पीडित युवतीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले.

पीडित युवतीचे अश्लील फोटो घरच्याना पाठवेन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केले. यानंतर पीडित युवतीने अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून रविवारी रात्री उशिरा पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विजय शिंदे याच्याविरुद्ध शून्य एफआयआर नोंदवला. यानंतर पैठण पोलिसांनी हे प्रकरण वाकड पोलिस स्टेशन (पिंपरी चिंचवड पुणे) कडे वर्ग केला आहे. वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.

एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मारेकरी कसा अडकला जाळ्यात पाहा…

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

लॉजवर अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध सुरू असताना झाला मृत्यू…

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…

पुणे शहरात पत्नीला लॉजवर घेऊन गेला अन् घात केला…

पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!