अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…

पाटणा (बिहार): सुनेच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने सासूला जीव गमवावा लागल्याची घटना पालीगंज भागात घडली आहे. सुनेच्या प्रियकराने सासूला बंदुकीची गोळी तोंडात मारून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पालीगंज इथल्या सिगोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवरिया गावात ही घटना गुरुवारी (ता. 14) रात्री घडली. आरोपीने रात्री सगळे झोपल्यानंतर घरात येऊन महिलेवर धारदार हत्याराने वार केला आणि नंतर तिच्या तोंडात गोळी मारली. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. हे कृत्य आरोपीनं महिलेच्या पतीसमोरच केले. गुड्डी देवी (40) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी सुंदर यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

गुड्डी देवी यांच्या सुनेशी गावातील एक तरुण सुंदर यादव याचे प्रेमप्रकरण सुरू होते. गुड्डी देवीला याबाबत समजल्यानंतर विरोध केला. त्यामुळे त्यानं सासूचा काटा काढायचे ठरवले. घरातील सगळे झोपल्यानंतर रात्री त्यानं घरात घुसून गुड्डी देवी यांच्या गळ्यावर धारदार हत्यारानं वार केले आणि नंतर त्यांच्या तोंडात गोळी मारली. त्यामुळे गुड्डी देवी यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पालीगंज येथील डीएसपी-1 प्रीतम कुमार यांनी दिली.

आरोपी सुंदर यादव गुड्डी देवी यांच्या मुलासोबत राजस्थानात मजुरीचे काम करायचा. त्यावेळी महिलेची सूनही राजस्थानात राहायची. त्या दोघांमध्ये तेव्हाच ओळख झाली. काही दिवसांपूर्वी सणासाठी ते दोघे गावी आले होते. आरोपी सुंदर नेहमी सुनेला भेटण्यासाठी यायचा. त्यामुळे गुड्डी देवी यांना संशय आला आणि त्यांनी सुनेला त्यावरून हटकले. गुड्डी देवी यांनी त्यांच्या सुनेच्या वागण्याचा विरोध केला. ते आरोपी सुंदरला आवडलं नाही. त्यामुळे त्याने गुड्डी देवी यांची हत्या केली. आरोपी सुंदर यादवला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…

Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…

दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…

अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!