पुणे शहरात पत्नीने चिकन न दिल्याने चिमुकलीच्या डोक्यात घातली वीट…

पुणे : पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने पोटच्या पोरीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात असलेल्या पूनम बेकरी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार (रा. पंचवटी, पाषाण) यांनी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विकास नागनाथ राठोड असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास राठोड याला सोमवारी रात्री पत्नीने जेवण दिले. परंतु, जेवणात चिकन नसल्याने त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार यांनी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

हडपसर तपास पथकाकडून अल्पवयीन मुले ताब्यात; घरफोडीचे गुन्हे उघड…

पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल…

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!