
माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…
धुळे: पाकिस्तानातून तीन महिने २१ दिवस यातना सहन करून भारतात परतलेले माजी जवान चंदू चव्हाण यांना धुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील काय कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी पाकिस्तान कसा आणि कशासाठी गेलो होतो, हे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगावे म्हणजे जनतेला समजेल तरी. यानंतर माझ्या आक्रोशाचे कारण समजेल, असेही चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.
लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?
चंदू चव्हाण यांची जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, ही प्रमुख मागणी आहे. लष्करातून काढल्यानंतर पेन्शन नाही, नोकरी मिळत नाही मग करायचे काय? असा सवालही चंदू चव्हाण त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला सेवेत घेतलं जावे यासाठी त्यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांची अनेक वेळा भेट घेतली. त्यांना निवेदनं दिली. पण त्यावर काही झाले नाही.
चंदू चव्हाण हे धुळे महानगरपालिकेच्या कार्यालयात अनेक दिवसांपासून चकरा मारत आहेत. शिवाय, त्यांच्या घराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. या संदर्भात ते वारंवार मनपाकडे पाठपुरावा करून देखील त्यांच्या परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे चंदू चव्हाण यांनी महापालिका आयुक्त यांच्या दालना बाहेर जोरदार आंदोलन केले. त्यांच्या आंदोलना वेळी अनेक जण जमा झाले होते. शिवाय महापालिकेचे काम कसं सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. चंदू चव्हाण यांना आयुक्तांच्या केबिन समोरून हटवण्यासाठी मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी युवराज खरात तिथे आले. त्यांनी त्यांना थेट मारहाण केल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. ही मारहाण होत असताना त्यांनी एक व्हिडीओ शुट केला आहे. या व्हिडीओत त्यांना धक्काबुक्की होताना दिसत आहे. आधी त्यांना लाथ मारली नंतर धक्का मारताना या व्हिडीओत दिसत आहे. एका माजी सैनिकाला अशी वागणूक दिली जाते, असं चंदू चव्हाण त्या व्हिडीओत दिसत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यावर आता संबंधीत कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चंदू चव्हाण हे गुन्हा दाखल करत आहेत.
दरम्यान, चंदू चव्हाण हे मुळचा धुळे जिल्ह्यातील आहेत. ते 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होता. भारत सरकारने केलेल्या जोरदार प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली होती. ज्या वेळी ते धुळ्यात परत आले, त्यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्यात आले होते. परंतु, धुळे शहरातच त्यांना मारहाण झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर करणार राजकारणात प्रवेश? RPI पक्षाकडून…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

