पत्नीने बुलेट नेल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला अन् नको ते घडलं…

मुंबई: नवी मुंबईतील आग्रोळी येथील वैभव पाटील (वय 30) यांनी पत्नीसोबत झालेल्या वादानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

वैभव पाटील आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. या वादातूनच दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय झाला होता. मात्र, वैभव यांची बुलेट पत्नीने नेल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. या वादानंतर वैभव नैराश्यात होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपविले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी ते एकटेच होते. घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सीबीडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…

प्रेमप्रकरण! युवकाला मारहाण करत घरापर्यंत आणले अन् युवकाने घेतला गळफास…

सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!