
एका चपलेमुळे गेली 11 पोलिसांची नोकरी; कशी पाहा…
कल्याण: एका चप्पलेमुळे तब्बल 11 पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे. न्यायालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चप्पलेमुळे 11 पोलिसांचे निलंबन झाले आहे. कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे.
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात 21 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु होते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या किरण संतोष भरम (वय २२) याने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने पायातली चप्पल भिरकावली. न्यायमूर्तींच्या दिशेने आरोपीने चप्पल फेकून मारल्याने न्यायालयामध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. मात्र हा तपास सुरु असतानाच आता पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अरूण कोकीतकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरणविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा ठपका ठेवत किरणवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कल्याण न्यायालयात न्यायाधीशावर एका कैदीने चप्पल भिरकावल्याच्या प्रकरणाबरोबरच अन्य एका प्रसंगी एक व्यक्ती बंदूक घेऊन कल्याण न्यायालयाच्या आवारात फिरत असल्याचे समोर आले होते. दोन्ही प्रकरणांमध्ये संयुक्तरित्या ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलीस मुख्यालय आणि कल्याणच्या उपायुक्तांनी 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…
गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…

