नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…

नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. संदर्भात नाशिकचे पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मंगळवारी रात्री हटवण्यात आला आहे. पहाटे साडेपाच वाजता या दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ झाला असून आतापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता तोडकामानंतरचा बांधकामाचा राडारोडा वेगाने हटवला जात आहे. तत्पूर्वी काल रात्री दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ करण्यापूर्वी काही धार्मिक विधी पार पडले. यावेळी सातपीर दर्ग्याबाहेर मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. उच्च न्यायालयाने सातपीर दर्गा हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी हा दर्गा हटवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मंगळवारी रात्री एका जमावाने दगडफेक केल्याने याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नाशिकचे पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘दर्ग्याचे ट्र्स्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी बांधकाम हटवण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री 11 वाजता हे सगळे जमले होते. त्याचवेळी उस्मानिया चौकाच्या बाजूने जमाव आला आणि गोंधळ सुरु झाला. दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही जमावातील लोकांना समजावले. मात्र, त्यांनी कोणाचेही न ऐकता दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. जमावाच्या दगडफेकीत 31 पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. जमावातील संशयित हल्लेखोरांच्या 57 बाईक्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.’

सध्या काठे गल्ली परिसरातील मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेने 15 दिवसांत सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, हे बांधकाम हटवण्यात न आल्याने पालिकेकडून सातपीर दर्गा जमीनदोस्त करण्यात आला होता.

नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून दगडफेक; अनेक पोलिस जखमी…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!