पुणे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉटेलचे लॉक तोडले अन् झाले अवाक…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाहेरून हॉटेलला कुलूप, आत अंधार. पण जेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलिसही चक्रावले. ‘एलडिनेरो’ हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या एका व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौकातील ‘मोदी प्लाझा’ इमारतीत ‘एलडिनेरो’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस पथक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. मात्र, हॉटेलचे शटर घट्ट बंद होते. पोलिसांनी वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अग्निशमन दलाच्या जवानांनी शटरचे कुलूप तोडताच पोलिसांनी आत धाड टाकली. बाहेरून बंद वाटणाऱ्या या हॉटेलमध्ये आत मात्र ग्राहकांची मोठी गर्दी होती. कामगार ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना तंबाखूजन्य हुक्का पुरवत होते. बाहेरून शांत दिसणाऱ्या या हॉटेलमध्ये आत हुक्क्याचा धूर आणि बेकायदेशीर व्यवहार जोमात सुरू असल्याचे दिसले.

या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालक प्रतीक मेहता, व्यवस्थापक सनी परिहार याच्यासह पाच वेटरवर गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, मालकाच्या सांगण्यावरूनच हे हुक्का पार्लर गुपचूप चालवले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २२ हजार ५६० रुपयांचे हुक्का साहित्य आणि मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…

पुणे! नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद…

पुणे! दुधवाल्याला डिजिटल लॉकचा अचुक पासवर्ड समजला अन् मारला डल्ला…

Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!