धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी लग्न अन् आत्महत्या; टोमने पाहा…
मुंबईः डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून जागृती बारी (वय २४, रा. डोंबिवली) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
जागृती बारी आपले पती आणि सासूसोबत राहत होती. तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास येतो, असे टोमने विवाहितेला मारले जात होते. पती आणि सासूच्या रोजच्या टोमन्याने जागृतीने लग्नाच्या दोन महिन्यांनी आत्महत्या केली आहे. जागृतीने मोबाईलमध्ये नोट लिहून तिची सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरले आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
भुसावळ तालुक्यातील जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी सोबत 20 एप्रिल 2024 रोजी झाला होता. सागर हा मुंबई पोलिस दलात आहे. पण, लग्नानंतर हुंड्यावरून त्रास देणे सुरू होते. 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला. जागृतीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला असा फोन आला होता. यानंतर तिचे वडील, आई आणि काही नातेवाईक कल्याणमध्ये आले. यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर दाखल केला आहे.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
दरम्यान, जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलं आहे. ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस तूझे ओठ काळे आहेत तोंडाचा घाण वास येतो असे हिणवुन तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे.’, जागृतीचा मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला लॉक ओपन करता आला नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली, ज्यात जागृतीने सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरले होते. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…
TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…