प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

परभणी : प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका युवतीसोबत तीर्थक्षेत्र आळंदीस जावून प्रेम विवाह केला होता. दोन-अडीच महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते. मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून माधव अवकाळे याने स्वतःच्या मुलास बोलावून घेतले होते. शेतात झोपी गेलेल्या गोविंद या मुलावर माधव आवकाळे आणि त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश आवकाळे या दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. त्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

या घटनेची माहिती कळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, उपनिरीक्षक गजानन काठेवाड, शिवकांत नागरगोजे, आप्पाराव वराडे, अतूल टेहरे, संदीप साळवे आदींनी घटनास्थळी धाव घेवून लगेचच तपास सुरु केला. त्यात आरोपी हे घरातीलच सदस्य असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर माधव आवकाळे आणि व्यंकटेश आवकाळे या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाप आणि भावाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!