सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने केला पत्रकाराविरुद्ध खंडणी व ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील एका पत्रकाराने सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 (1) (S) 3 (2) (va) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी (SDPO) रामेश्वर व्यंजने हे करीत आहे.

पांढरकवडा येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयाचे पोलिस पथक आरोपी कज्जूम कुरेशी यांस अटक करण्यासाठी त्याचे घाटंजी येथील घरी गेले असता, आरोपी निदर्शनास आला नाही. पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पोलिस पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिती लांजेवार, उप विभागीय पोलिस अधिकारी यांचे रायटर रवि सिंहे, PC देठे व PC महेश आदींचा समावेश होता. तथापि, बुधवारी पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे एक पथक पुन्हा कारंजा व वाशीम जिल्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी रवाना झाल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिस स्टेशन घाटंजीचे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने सद्या ते संपूर्ण कुटूंबासह पोलिस स्टेशनच्या क्वार्टर मध्ये राहत आहे. सिडाम यांचे निवृत्ती वेतनाचे पैसे मिळायचे असल्याने ते पोलिस स्टेशनच्या सरकारी निवासस्थानी वास्तव्य करीत आहे. तेव्हा, पत्रकार कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना सांगितले की, तुम्ही सरकारी क्वार्टर सोडत नाही म्हणून ‘मी तुमची बातमी तयार केली आहे’. अगर पेपर में नही छापना है तो, मुझे 15,000 रुपये देना पडेगा, असे सिडाम यांना म्हटले. तेव्हा, सिडाम यांनी सांगितले की, मला एक दोन महिने सरकारी क्वार्टर मध्ये थांबायचे आहे. नंतर माझ्या घराचे बांधकाम झाल्यावर सरकारी क्वार्टर सोडून देईन, असे सिडाम यांनी म्हटले. ‘अगर तुम पैसे नही दिये तो तुम्हारी बातमी मैं पेपरमें छापता’, अशी धमकी दिली. तेव्हा, सिडाम यांनी सद्या माझ्या जवळ ₹ 2,000 आहे. पैसे भेटायचे आहे, सद्या तंगी आहे, असे सिडाम यांनी सांगितले.

संबंधित पत्रकाराने मला 15,000 रुपये द्या म्हणून सिडाम यांच्या मागे तगादा लावला व सद्या 2,000 रुपये तरी द्या. उर्वरित रक्कम उद्या द्या, असे पत्रकाराने सांगितले. तेव्हा, सिडाम यांनी म्हटले की, मेरे पास अभी पैसे नही जमते. बादमें देखेगें असे म्हणून सिडाम हे आपल्या क्वार्टरकडे निघून गेले. 19 सप्टेंबर रोजी व्हॉटसॲप ग्रुप वर विदर्भ मतदार या वृत्तपत्राचे एक कात्रण आले. त्या बातमीत सिडाम हे राहत असलेल्या पोलिस स्टेशन क्वार्टरची बातमी कज्जूम कुरेशी यांनी प्रसारित केली होती, असा आरोप सिडाम यांनी केला आहे. त्यामुळे पेपरला बातमी आल्याने सिडाम यांची मानहानी व बदनामी झाली आहे, असे सांगितले. तसेच 21 सप्टेंबर रोजी सिडाम हे मार्केट मध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन परत येताना पोलिस स्टेशनच्या दाराजवळ पत्रकार कज्जूम कुरेशी हा बाजूला मोटार सायकल लावून उभा होता. तेथुन सिडाम हे जात होते. तेव्हा संबंधित पत्रकाराने सिडाम यांना आवाज देऊन थांबविले व म्हणाला की, ‘जम गई क्या बातमी’. तेव्हा सिडाम यांनी सांगितले की, ‘भैय्या मैने तुमको 2,000 रुपये दिये और भी देता करके बोला था’. तो भी तुमने तुम्हारे पेपर में मेरी बातमी प्रकाशित की है, असे म्हटले असता बाकी के पैसे अभी देदो, नही तो सभी पेपर में तुम्हारे फोटो सहीत बातमी लगायेंगे, अशी धमकी सिडाम यांना दिली. संबंधित माहिती विलास गोविंदराव सिडाम यांनी तक्रारीमध्ये लिहीली आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीमध्ये हत्तीचं बळः सुबोध भावे

Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…

दहा लाखांची खंडणी प्रकरणी पोलिसांची तत्काळ कारवाई; पण लागले वेगळे वळण…

बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे खंडणीची मागणी…

दहा लाखांची खंडणी प्रकरणी पोलिसांची तत्काळ कारवाई; पण लागले वेगळे वळण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!