
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
पुणे: पुणे शहरातील बाणेर परिसरात राहात असलेल्या बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने दाजीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मेव्हणा धनंजय पद्माकर साडेकर (वय 36) आणि हेमंत रत्नाकर काजळे (वय 40) अशी दोघा मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
धनंजय साडेकर याचा काजळे याच्या बहिणीशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतरही त्यांच्यात सतत वाद होत होते. बहिणीसोबत वाद घालत असल्याच्या रागातून काजळे याने धनंजयला जाब विचारला आणि यामधून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद सुरू असतानाच साडेकर यांच्या डोक्यात हेमंत काजळे याने लोखंडी गज मारला. डोक्यात गज लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व अति रक्तस्त्राव झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती काजळेने बहिणीला कळवली नंतर त्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर बहिणीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…
पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…
पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…