प्रसिद्ध गायिकेने झोपेच्या गोळ्या घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न…

हैदराबाद : एका प्रसिद्ध गायिकेने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कल्पना राघवेंद्र असे गायिकेचं नाव आहे. ती प्रसिद्ध तेलुगू गायिका आणि टीव्ही स्टार आहे. कल्पना राघवेंद्र हिने हैदराबादमधील तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. पोलिसांना गायिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या अभिनेत्रीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायिका कल्पना राघवेंदर हिने तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मंगळवारी, कल्पनाच्या अपार्टमेंटची माहिती रहिवासी संघटनेने दिल्यानंतर पोलिस तिच्या घरी पोहोचले आणि घराचा दरवाजा तोडला. ती तिच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे त्यांच्या सुरक्षा रक्षकांना लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. घटनेच्या वेळी तिचा पती चेन्नईमध्ये होता.

डॉक्टरांनी सांगितले की, कल्पना राघवेंद्र हिने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. आता तिचा जीव धोक्याबाहेर आहे. ती शुद्धीवर आल्यानंतर सर्व काही उघडकीस येईल. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, कल्पना हिने वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 2010 मध्ये स्टार सिंगल्स मल्याळम जिंकला. तिथून तिला लोकप्रियता मिळाली. तिने इलैयाराजा आणि ए.आर. रहमान सारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. तिने आतापर्यंत 1500 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. कल्पनाने 1986 मध्ये कमल हासनच्या ‘पुन्नगाई मन्नन’ या चित्रपटात ती एका छोटीशी भूमिका साकारली होती. याशिवाय, ती ‘बिग बॉस तेलुगु’ (सीझन 1) ची स्पर्धक देखील राहिली आहे. 2014 मध्ये, तिने ‘केशव चंद्र रामावत’ या तेलुगू चित्रपटातील ‘तेलंगणा तेजम’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…

भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!