
शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मोठा खुलासा समोर…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात एका विवाहित महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले होते. गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथील ईशान सोसायटीमधील ‘प्रथम’ बंगल्यात ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिल्पा सचिन गवारे (वय ४२, रा. ईशान सोसायटी, वाकड) असं मृत पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे भाऊ संतोष गुलाब कलाटे (वय ४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत महिलेचा पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे या सर्वांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
View this post on Instagram
शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. विवाहितेनं आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात घडला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. विवाहितेने ज्या बेडरुममध्ये टोकाचं पाऊल उचललं, त्या बेडरुमबाबत धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये सचिन गवारे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी सासरच्या मंडळींनी सचिनवर पूर्वी एका खुनाचा गुन्हा दाखल असून खटला सुरू असल्याची माहिती लपवून ठेवली होती. लग्नानंतर या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन तो चार वर्षे तुरुंगातही राहिला होता.
सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी शिल्पा यांच्याकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू केला. पती सचिन दारूच्या व्यसनाधीन असल्याने तो सतत तिला बेदम मारहाण करत असे, तर सासू संजीवनी चारित्र्यावर संशय घेत होती. शिल्पाच्या भावाने बहिणीचा संसार टिकावा म्हणून वेळोवेळी सासरच्या लोकांना रोख रक्कम दिली, तसेच व्यवसाय आणि प्लॉट खरेदीतही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिल्पा यांनी माहेरच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर भावांच्या बाजूने सह्या केल्याचे समजताच सासरच्यांचा संताप अनावर झाला. “तुझ्या बापाच्या मालमत्तेत हिस्सा घे,” अशी धमकी देत त्यांचा छळ आणखी तीव्र करण्यात आला.
सासरच्या लोकांनी शिल्पा यांनी बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे माहेरच्यांना सांगितले आणि त्यांना खाजगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परंतु, बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास कसा घेतला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत माहेरच्यांनी या मृत्यूबाबत तीव्र संशय व्यक्त केला आहे. ही आत्महत्या नसून सासरच्यांनीच तिची हत्या केली असावी असा गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…
पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…
पुणे! पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी अन् संशयाचं घुसलं भूत…

