
मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू…
मुंबई (संदीप कद्रे): मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन राधिका रस्तोगी (भा.प्र.से.) प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडले.
अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलिस महासंचालक, व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा योगेश देसाई, कारागृह उपमहनिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा मुंबई तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा करणाऱ्या Allen Group चे श्री योगिंद्र रेड्डी तसेच श्री.महेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वरळी मुंबई आदी यावेळी उपस्थित होते.
नवीन व्ही. सी. युनिट व सर्कल क्र. 8 समोर स्मार्ट कार्ड दूरध्वनी यंत्रणेचे उद्घाटन झाले. यावेळी बंदी बांधवांनी स्मार्ट कार्ड चा वापर करून आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक, व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांनी प्रमुख अतीथींचे रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कारागृह विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमाबाबत प्रमुख अतिथींना माहिती देऊन बंदी बांधवांशी संवाद साधला.
प्रमुख पाहुण्या राधिका रस्तोगी, प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांनी बंदी बांधवांना मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर विनोद शहा के. गिरधरलाल इंटरनॅशनल प्रा. ली. यांच्याकडून semi automatic biochemistry analyzer with incubator हे रक्त तपासणी यंत्र बंद्याकरीता कारागृहास भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचा 350 बंदी बांधवांनी लाभ घेतला.
अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…
ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…
अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…
येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

