सातारा! युवकाला कारच्या दरवाजाला लोमकळत 3 किमी फरफटत नेलं…

सातारा: साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्याच्या वादातून युवकाला कारच्या दरवाजाला लोमकळत घेऊन तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संतप्त जमावाने पाठलाग करून नागेवाडी हद्दीत कार अडवल्यानंतर कारची तोडफोड करत कारमधील दोघांना चांगलाच चोप देण्यात आला. सातारा तालुका आणि भुईंज पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला असून दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आनेवाडी टोलनाक्याजवळ किरकोळ वादातून घडलेल्या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कट मारण्याच्या वादातून कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला कारच्या दारात घेऊन तब्बल तीन किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त जमावाने कारचा पाठलाग करत नागेवाडी हद्दीत कार अडवली. युवकाची सुटका केल्यानंतर जमावाने कारची तोडफोड केली आणि कारमधील दोघांना बेदम चोप दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, सातारा तालुका आणि भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कारमधील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

सातारा पोलिसांची मोठी कारवाई; 3 महिलांसह बनावट पोलिसांना ठोकल्या बेड्या…

सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…

सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली…

सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…

सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!